आपणास कडविण्यात आनंद होतो कि बौद्ध व मागासवर्गीय सेवा संथा नागपूर च्या वतीने येत्या शनिवार दि. १३ फेब्रुवारी २०२४ सकाळी ६.०० वाजता सुराज्य दौडीचे आयोजन महाराष्ट्र ऍथलेटिक्स अससोसिएन यांचे अधिपत्याखाली नागपूर डिस्ट्रिक ऍथलेटिक्स अससोसिएन चे सहकार्याने करण्यात येणार आहे. ५००० शालेय विद्यार्थी व युवक या दौडीत सहभागी होतील असा अंदाज असून ३ विविध वयोगटाच्या या दौडीत महाराष्ट्राचे काना कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर धावपटू सहभागी होतील २१ कि मी अंतराचे मुख्य अर्ध मॅरथॉन (पुरुष व महिला गट) शर्यतीसह १४ आणि १८ वर्षाखालील मुला-मुलींसाठी अनुक्रमें ६ आणि ४ किमी अंतराच्या दौडी होतील . मुख्य आकर्षण: स्पर्धेचे मुख्य आकर्षण असेल ती सुराज्यदौड या दौडीत शहरातील विविध क्षेत्रातील नामांवत व्यक्ती ,शालेय व महाविद्यालयी युवक सोबत सुराज्याचा संदेश देण्या साठी धावतील . या सुराज्य दौडीत विविध देखावे ,संदेश फलक ,महापुरुषांचे वेशातील विदयार्थी ,स्केटर्स ,पथनाट्य बॅण्ड पथक , लेझीम पथक आदींचा समावेश असेल . नेतृत्व : या सुराज्य दौडीचे आयोजनासाठी मा. श्री प्रसन्नजी हरदास , क्रीडा भारतीचे राष्ट्रीय सहमंत्री मा. सतीश उचिल, सचिव महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन व श्री गुरुदेव नगराळे, अध्यक्ष नागपूर अॅथलेटिक्स असोसिएशन आणि सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजन समितीचे गठन करण्यात आले असुन श्री. प्रमोद तभाणे हे आयोजन अध्यक्ष आहेत. स्पर्धचे तांत्रिक व्यवस्थापक डॉ.विवेकानंद सिंह हे आहेत. स्पर्धेचा प्रारंभ आणि समारोप : सुराज्य दौड सह सर्व वयोगटाच्या शर्यतीचा प्रारंभ आणि शेवट बोधीसत्व चौक (माटे चौक ) अंबाझरी येथे होईल. २१ किमी अंतराच्या मुख्य शर्यतीचे मार्गासह विविध वयोगटांच्या आणि सर्वात शेवटी होणाऱ्या ४ किमी अंतराच्या सुराज्य दौडीचे मार्गावर दुतर्फा लोकांची गर्दी अपेक्षित धरता या संपूर्ण मार्गाचे सुशोभीकरण करण्यात येईल तसेच ठीकठिकाणीं स्वागत कमानी (गेट) उभारण्यात येतील.
NAGPUR: State-level open Surajya Daud, organized by the Bouddha va Magasvargiya Sewa Sanstha will be held here on January 13. The annual cross-country meet will be held under the auspices of Maharashtra Athletics Association and Nagpur District Athletics Association and will begin from Mate Chowk at 6 am on Saturday
- participant certification (Online on Your mail Id)
- T-Shirt
- Snacks
- Full Assistance during the marathon
क्रमांक | राज्यस्तरीय | जिल्हा स्तरीय गट | नागपूर जिल्ह्यातून पहिल्या दहा क्रमांकाचे | ||||
पुरुष खुला गट २१.०९७ कि.मी |
महिला खुला गट २१.०९७ कि.मी |
१८ वर्षाखालील मुले ६ कि.मी |
१८ वर्षाखालील मुली ६ कि.मी |
१४ वर्षाखालील मुले ३ कि.मी |
१४ वर्षाखालील मुली ३ कि.मी |
नागपूर जिल्ह्यातून पहिल्या दहा क्रमांकाचे | |
पहिला | २१००० | २१००० | ५००० | ५००० | ३००० | ३००० | पुरुष व महिला (अर्ध मॅरेथॉन शर्यतीतील) स्पर्धकांना बोनसराशी देण्यात येईल. टीप : अर्ध्या मॅरेथॉन शर्यत एक तास तीस मिनिटात पूर्ण करणाऱ्या सर्व पुरुष धावकांना तर दोन तासात स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व महिला (अर्ध मॅरेथॉन शर्यतीतील) धावकांना कास्य पदक देण्यात येईल . |
दुसरा | १५००० | १५००० | ३००० | ३००० | २००० | २००० | |
तिसरा | ७००० | ७००० | २००० | २००० | १००० | १००० | |
चौथा | ५००० | ५००० | १००० | १००० | ७०० | ७०० | |
पाचवा | ३००० | ३००० | ७०० | ७०० | ७०० | ७०० | |
सहावा | २००० | २००० | ७०० | ७०० | ७०० | ७०० | |
सातवा | १००० | १००० | ७०० | ७०० | ७०० | ७०० | |
आठवा | १००० | १००० | ५०० | ५०० | ५०० | ५०० | |
नववा | १००० | १००० | ५०० | ५०० | ५०० | ५०० | |
दहावा | १००० | १००० | ५०० | ५०० | ५०० | ५०० | |
एकूण रु. १,७०,००० |
शनिवार १३ जानेवारी २०२४
सकाळी ६.०० वाजता
स्थळ : बोधिसत्व चौक , दक्षिण अंबाझरी रोड ,
गोपाल नगर ,नागपूर.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
- श्री. रामचंद्र वाणी : 9579374554
- श्री. अतुल गेडाम : 8928595968
- श्री. एडविन अँथनी : 9595450585